AmravatiLatest NewsWeather Report

अमरावतीत उन्हाचा तडाखा वाढला; तापमान 38° पार, रस्ते झाले ओस पडले!

अमरावती शहरात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस तीव्र होत असून तापमानाने पुन्हा एकदा 38 अंश सेल्सियसचा टप्पा ओलांडला आहे. प्रखर उन्हामुळे दुपारच्या सुमारास शहरातील मुख्य रस्त्यांवर वाहनांची गर्दी लक्षणीयरीत्या कमी झाल्याचे चित्र दिसत आहे.

मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे तापमानात काहीशी घट झाली होती. त्यामुळे नागरिकांना उष्णतेपासून थोडा दिलासा मिळाला होता. मात्र, आता वातावरण पुन्हा कोरडे आणि उष्ण झाले असून उन्हाचा तडाखा अधिक जाणवू लागला आहे.

दुपारच्या वेळेत नागरिक घराबाहेर पडणे टाळत असून अत्यावश्यक कामासाठीच बाहेर पडत आहेत. रस्त्यांवर नेहमीची वर्दळ कमी झाली असून बाजारपेठाही तुलनेने शांत दिसत आहेत.

दरम्यान, डॉक्टरांकडून नागरिकांना उष्माघात टाळण्यासाठी भरपूर पाणी पिण्याचा, डोक्यावर संरक्षण ठेवण्याचा आणि शक्यतो दुपारच्या उन्हात बाहेर न पडण्याचा सल्ला दिला जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button