Amravati Gramincitynewslatestnewss breakingnews

अचलपूरमध्ये रस्त्याच्या कामावरून वाद पेटला; बच्चू कडू आक्रमक!

पोलीस स्टेशन ते देवडी रस्त्याच्या कामासाठी व्यापाऱ्यांचा संताप; दोन दिवसांत काम पूर्ण न झाल्यास मुख्याधिकारी आणि अभियंत्याला भरचौकात ठोकण्याचा बच्चू कडू यांचा इशारा

सिटी न्यूज | अचलपूर

अमरावती जिल्ह्यातील अ वर्ग नगरपालिकांमध्ये समावेश असलेल्या अचलपूर शहरात पोलीस स्टेशन ते देवडीपर्यंतच्या रस्त्याच्या कामावरून वाद चांगलाच पेटला आहे. रस्त्याच्या रखडलेल्या कामामुळे व्यापाऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत असल्याने व्यापाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे आमदार तथा माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी व्यापाऱ्यांची भेट घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी नगरपालिकेच्या प्रशासनाला दोन दिवसांचा अल्टिमेटम देत काम पूर्ण न झाल्यास मुख्याधिकारी आणि अभियंत्याला भरचौकात ठोकण्याचा इशारा दिला.

अचलपूर शहरातील पोलीस स्टेशन ते देवडी या मार्गावरील रस्त्याच्या कामाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रस्त्याच्या कामातील दिरंगाईमुळे व्यापारी वर्गाला व्यवसाय करताना अडचणी येत असल्याची तक्रार व्यापाऱ्यांनी आमदार बच्चू कडू यांच्याकडे मांडली. व्यापाऱ्यांच्या समस्या ऐकून घेतल्यानंतर कडू यांनी संबंधित कामाबाबत नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना जाब विचारत तीव्र नाराजी व्यक्त केली.

यावेळी बच्चू कडू यांनी संबंधित मुख्याधिकारी आणि अभियंत्याला दोन दिवसांत रस्त्याचे काम पूर्ण करण्याचा इशारा दिला. निर्धारित मुदतीत काम पूर्ण न झाल्यास भरचौकात मुख्याधिकारी आणि अभियंत्याला ठोकणार, अशी आक्रमक भाषा त्यांनी वापरली. त्यांच्या या वक्तव्यामुळे अचलपूरमधील रस्त्याच्या कामाचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.

या प्रसंगी स्वीकृत नगरसेवक अभय माथने, प्रहारचे नेते बल्लू जवंजाळ यांच्यासह परिसरातील व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आता बच्चू कडू यांनी दिलेल्या दोन दिवसांच्या मुदतीत संबंधित रस्त्याचे काम पूर्ण होते का आणि नगरपालिका प्रशासन यावर काय कार्यवाही करते, याकडे व्यापारी व नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button