Crime News

धामोरी बसस्टॉपवर युवकाची निर्घृण हत्या | धारदार शस्त्राने केला खून

अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील धामोरी बसस्टॉप परिसरात एका युवकाची धारदार शस्त्राने भोसकून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, मृत युवक हा वाठोडा शुक्लेश्वर येथील रहिवासी असल्याचे समोर आले आहे. मात्र, त्याची अधिकृत ओळख आणि इतर तपशील पोलिसांकडून पडताळले जात आहेत.
घटना जुन्या वादातून किंवा किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणातून घडल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात येत आहे. हल्ल्यानंतर युवकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच खोलापूर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. हत्येमागील नेमके कारण काय, याचा तपास सुरू आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button