Accident NewscitynewsLatest NewsMaharashtraNanded

नांदेडच्या आसना पुलावर भीषण अपघात! ट्रकचालकाचा मृत्यू, पोलीस हवालदार गंभीर जखमी

कट मारण्यावरून वाद अन् पुलावर वाहने थांबवली; मागून आलेल्या लोडिंग ट्रकची जोरदार धडक

नांदेड | सिटी न्यूज

नांदेड येथील आसना पुलावर रात्री भीषण अपघाताची घटना घडली. वाहनाला कट मारण्याच्या कारणावरून ट्रक आणि कारचालकांमध्ये वाद झाला. दोघांनीही आपली वाहने पुलावरच थांबवल्याने वाहतुकीत अडथळा निर्माण झाला. दरम्यान, मागून आलेल्या लोडिंग वाहनाने थांबलेल्या ट्रकला जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत एका ट्रकचालकाचा जागीच मृत्यू झाला, तर वाहतूक सुरळीत करण्यासाठी गेलेले पोलीस हवालदार व्यंकटेश गंभीर जखमी झाले.

कट मारण्यावरून वाद; वाहने पुलावरच थांबवली

मिळालेल्या माहितीनुसार, रात्री साडेआठच्या सुमारास आसना पुलावर कट मारण्याच्या कारणावरून ट्रक आणि कारचालकांमध्ये वाद झाला. या वादादरम्यान दोघांनीही आपापली वाहने पुलावरच थांबवली.

या घटनेची माहिती डायल ११२ वर मिळाल्यानंतर विमानतळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करत असतानाच मागून आलेल्या लोडिंग वाहनाने थांबलेल्या ट्रकला जोरदार धडक दिली.

धडकेत एकाचा मृत्यू; पोलीस हवालदार गंभीर

या भीषण धडकेत एका ट्रकचालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. वाहतूक नियंत्रणाचे काम करत असलेले पोलीस हवालदार व्यंकटेश हेही गंभीर जखमी झाले. धडकेमुळे वाहने एकमेकांत अडकल्याने बचावकार्य करणे आव्हानात्मक बनले.

गॅस कटर आणि क्रेनच्या मदतीने बचावकार्य

अपघातानंतर अडकलेली वाहने आणि मृतदेह बाहेर काढण्यासाठी गॅस कटरचा वापर करण्यात येत असल्याची माहिती आहे. KTN, शारदा कन्स्ट्रक्शन, खासगी क्रेन आणि अग्निशमन दलाच्या मदतीने बचावकार्य सुरू करण्यात आले.

या अपघातामुळे आसना पुलावरील वाहतुकीवर परिणाम झाला. घटनेचे नेमके कारण आणि अपघातातील इतर तपशील याबाबत पुढील माहितीची प्रतीक्षा आहे.

बाईट — विजय पाटील, महामार्ग प्रभारी अधिकारी, नांदेड

सिटी न्यूज | नांदेड

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button