AmravaticitynewsLatest NewsMaharashtra

अमरावती महापालिकेची थकबाकीदार मालमत्तांवर सीलची कारवाई

५ ते ६ वर्षांपासून मालमत्ता कर थकीत; दोन मालमत्तांवर कारवाई, ३ लाख ६७ हजार ४६७ रुपयांची थकबाकी

अमरावती, दि. २८ ऑक्टोबर : अमरावती महानगरपालिकेने मालमत्ता कराची थकबाकी वसूल करण्यासाठी कारवाईचा धडाका सुरू केला आहे. आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांच्या निर्देशानुसार, पूर्व झोन क्रमांक ३ अंतर्गत दस्तूरनगर परिसरातील पाच ते सहा वर्षांपासून मालमत्ता कर न भरलेल्या दोन मालमत्तांना २८ ऑक्टोबर रोजी सील लावण्यात आले.

महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, वॉर्ड क्रमांक C-7 मधील मालमत्ता क्रमांक २७०२ चे धारक प्रकाश त्र्यंबकराव बल्हाळ यांच्याकडे २ लाख ५७ हजार ५७६ रुपये, तर मालमत्ता क्रमांक ११३१ चे धारक किशोर बागडे यांच्याकडे १ लाख ९ हजार ८९१ रुपये मालमत्ता कर थकीत आहे. या दोन्ही मालमत्तांची एकूण थकबाकी ३ लाख ६७ हजार ४६७ रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

आयुक्तांच्या निर्देशानुसार कारवाई

ही कारवाई झोन क्रमांक ३ चे सहाय्यक आयुक्त नितीन बोबडे आणि क्षेत्रीय अधिकारी प्रवीण ठाकरे यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यावेळी C-7 चे कर लिपिक राज डेंडूले, आकाश चौधरी आणि सिद्धांत गाडे उपस्थित होते.

थकबाकीदारांना कर भरण्याचे आवाहन

मालमत्ता कर विभागामार्फत थकबाकी वसुलीसाठी अशा प्रकारची कारवाई करण्यात येत आहे. नागरिकांनी आपल्या मालमत्तेचा कर वेळेत भरून महानगरपालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

सिटी न्यूज | अमरावती

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button