citynewsLatest NewsMaharashtraNagpur
मध्य नागपुरात काँग्रेसकडून विजयाच्या जल्लोषाची तयारी

आमदार अभिजित वंजारी यांच्या विजयाच्या घोषणेनंतर गोळीबार चौकात जल्लोषाचे आवाहन
नागपूर : मध्य नागपूर काँग्रेस पक्षाच्या वतीने आमदार अभिजित वंजारी यांच्या विजयाच्या जल्लोषाची तयारी करण्यात आली आहे. विजयाची अधिकृत घोषणा झाल्यानंतर सकाळी ११ वाजता गोळीबार चौक येथे एकत्र येऊन जल्लोष साजरा करण्याचे आवाहन काँग्रेस कार्यकर्ते स्वप्निल खापेकर यांनी केले आहे.
या जल्लोषात काँग्रेस पक्षाचे सर्व नेते, पदाधिकारी, ब्लॉक पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
आपली एकजूट हीच आपली ताकद! असा संदेश देत सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन विजयाचा आनंद साजरा करावा, असे खापेकर यांनी म्हटले आहे.
सिटी न्यूज | नागपूर



