citynewsLatest NewsMaharashtraWashim

वाशिम जिल्ह्यात HSRP नंबरप्लेट न बसविणाऱ्या ५८ हजार २४४ वाहनांवर कारवाईचा बडगा

मुदत संपल्यानंतर परिवहन विभागाची कारवाई सुरू; काही शासकीय वाहनांवरही नंबरप्लेट बसविणे बाकी

वाशिम : वाशिम जिल्ह्यात उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांकप्लेट (HSRP) न बसविणाऱ्या वाहनधारकांवर उपप्रादेशिक परिवहन विभागाने कारवाई सुरू केली आहे. ३० जूनची मुदत संपूनही जिल्ह्यातील तब्बल ५८ हजार २४४ वाहनांवर अद्याप HSRP नंबरप्लेट बसविण्यात आलेली नाही. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे.

१ लाख १९ हजार वाहनं HSRP साठी पात्र

वाशिम जिल्ह्यात एकूण १ लाख १९ हजार ४६९ वाहने HSRP नंबरप्लेट बसविण्यासाठी पात्र आहेत. त्यापैकी ६१ हजार २२५ वाहनधारकांनी नोंदणी केली आहे. मात्र, प्रत्यक्षात केवळ ४२ हजार ३५० वाहनांवरच HSRP नंबरप्लेट बसविण्यात आली आहे.

नोंदणी केलेल्या वाहनांची संख्या आणि प्रत्यक्ष नंबरप्लेट बसविलेल्या वाहनांची संख्या यामध्ये मोठी तफावत आहे. विशेष म्हणजे, काही शासकीय वाहनांवरही अद्याप HSRP नंबरप्लेट बसविणे बाकी असल्याची माहिती समोर आली आहे.

वाहनचोरी आणि बनावट नंबरप्लेटला आळा घालण्याचा उद्देश

वाहनांची सुरक्षित ओळख निश्चित करणे, वाहनचोरीच्या घटनांना आळा घालणे आणि बनावट नंबरप्लेटचा वापर रोखणे, हा HSRP बसविण्यामागील प्रमुख उद्देश आहे. त्यामुळे पात्र वाहनधारकांनी तातडीने नंबरप्लेट बसवून नियमांचे पालन करावे, असे आवाहन परिवहन विभागाकडून करण्यात येत आहे.

सिटी न्यूज | वाशिम

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button