citynewsLatest NewsMaharashtraMaharashtra PoliticsNagpurpolitics

नागपूरमध्ये भाजपला धक्का! पदवीधर मतदारसंघात अभिजित वंजारींचा विजय निश्चित

मतमोजणी अंतिम टप्प्यात; अधिकृत घोषणेपूर्वीच वंजारींची विजयाची प्रतिक्रिया, मतमोजणी केंद्रातून पदाधिकाऱ्यांसह रवाना

नागपूर | सिटी न्यूज

नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार अभिजित वंजारी यांच्या विजयाचे चित्र स्पष्ट होत असल्याची माहिती समोर आली आहे. मतमोजणी जवळपास पूर्ण झाली असून, वंजारी यांनी विजयाची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मात्र, निवडणूक निकालाची अधिकृत घोषणा होणे अद्याप बाकी असल्याचे सांगण्यात येत आहे.

भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसची कामगिरी

नागपूर हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गृहजिल्हा असल्याने या निवडणुकीच्या निकालाकडे विशेष लक्ष लागले होते. अशा परिस्थितीत पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचे अभिजित वंजारी आघाडीवर राहिल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

अधिकृत निकालाकडे लक्ष

मतमोजणी अंतिम टप्प्यात पोहोचल्यानंतर अभिजित वंजारी यांनी विजय झाल्याची प्रतिक्रिया दिली. त्यानंतर ते काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह मतमोजणी केंद्रातून रवाना झाल्याची माहिती आहे.

दरम्यान, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून अधिकृत निकाल जाहीर झाल्यानंतरच विजयावर शिक्कामोर्तब होणार आहे. त्यामुळे अधिकृत घोषणेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सिटी न्यूज | नागपूर

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button