Amaravti GraminAmravatiBreakingNewsEducation NewsEduMinMaharashtraLatest NewsMaharashtra

अमरावतीत तीन इंग्रजी शाळा अनधिकृत घोषित; पालकांना शिक्षण विभागाचा इशारा

अमरावती | प्रतिनिधी

फाल्कन, विजार्ड आणि गोल्डन स्टार इंग्लिश स्कूल विनापरवानगी सुरू असल्याचे निष्पन्न; प्रवेशापूर्वी शाळेची मान्यता तपासण्याचे आवाहन

अमरावती शहरात विनापरवानगी आणि मान्यतेशिवाय सुरू असलेल्या काही इंग्रजी शाळांविरोधात महानगरपालिका शिक्षण विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. शहरातील शाळांची तपासणी केल्यानंतर तीन शाळा अनधिकृतपणे सुरू असल्याचे आढळून आले असून त्यांची नावे अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहेत.

राज्यात इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे पालकांचा वाढता कल पाहायला मिळत असताना अनेक ठिकाणी परवानगी आणि मान्यता न घेता शाळा सुरू केल्या जात असल्याचे समोर येत आहे. याच पार्श्वभूमीवर अमरावती महानगरपालिका शिक्षण विभागाने शहरातील विविध शाळांची तपासणी केली.

तपासणीदरम्यान वलगाव रोड येथील फाल्कन इंग्लिश स्कूल, पुंडलिक बाबा नगर येथील विजार्ड इंग्लिश स्कूल आणि जमीन कॉलनी येथील गोल्डन स्टार इंग्लिश School या शाळा आवश्यक परवानगी व मान्यतेशिवाय सुरू असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे या तीनही शाळा अनधिकृत असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

शिक्षण विभागाने पालकांना सावधगिरीचा इशारा देत सांगितले आहे की, या शाळांमध्ये प्रवेश घेतल्यास भविष्यात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानाची जबाबदारी संबंधित पालकांची राहील. त्यामुळे कोणत्याही शाळेत प्रवेश घेण्यापूर्वी तिची शासकीय मान्यता, आवश्यक कागदपत्रे आणि इतर माहितीची खातरजमा करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, शहरातील शिक्षण क्षेत्रात वाढत असलेल्या अनधिकृत शाळांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तपासणी मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याचे संकेत शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button