Accident NewscitynewsLatest NewsMaharashtraNagpur

बोरुजवाडा उड्डाणपुलाजवळ भरधाव कार पलटी

भीषण अपघातात एक गंभीर जखमी; चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुर्घटना झाल्याची प्राथमिक माहिती

सावनेर | नागपूर

नागपूर–भोपाळ मार्गावरील बोरुजवाडा उड्डाणपुलाजवळ भरधाव कार पलटी होऊन भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात ब्रिजेश ठाकूर हे गंभीर जखमी झाले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी नागपूर येथे रेफर करण्यात आले आहे.

सावनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात झाला. अपघाताची माहिती सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड यांना मिळताच त्यांनी तत्काळ SDPO सागर खर्डे यांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच महामार्ग पोलीस आणि सावनेर पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली.

अपघातातील जखमींना सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड यांच्या मदतीने तातडीने सावनेर शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याठिकाणी डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर ब्रिजेश ठाकूर, वय ३० वर्षे, रा. कवठा, पाटणसावंगी, जिल्हा नागपूर यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नागपूर येथे हलवण्यात आले.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, MH 48 AC 4641 क्रमांकाची कार भरधाव वेगाने जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार रस्त्यावर पलटी झाली. चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

दरम्यान, या वाहनात वाहनाच्या क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसवण्यात आल्याची माहिती देखील समोर आली आहे. त्यामुळे अपघात नेमका कोणत्या परिस्थितीत घडला, वाहनाचा वेग किती होता आणि क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी होते का, याबाबत पोलीस तपास करत आहेत.

अपघातानंतर महामार्गावरील वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून आवश्यक कार्यवाही केली. या अपघाताचा पुढील तपास सावनेर पोलीस करीत आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button