citynewsFestival News

राणा कुटुंबीयांच्या ‘गंगा सावित्री’ निवासस्थानी गणरायाचे उत्साहात आगमन

माजी खासदार नवनीत राणा यांनी पारंपरिक पद्धतीने केले बाप्पांचे पूजन; पुढील नऊ दिवस भक्तिमय वातावरण

अमरावती : अमरावतीच्या बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांच्या ‘गंगा सावित्री’ निवासस्थानी गणपती बाप्पांचे मोठ्या उत्साहात आगमन झाले. गणेश चतुर्थीनिमित्त राणा कुटुंबीयांच्या वतीने विधिवत गणेश स्थापना करण्यात आली. यावेळी माजी खासदार नवनीत राणा यांनी पारंपरिक पद्धतीने गणरायाचे पूजन करून आरती केली.

गणरायाच्या आगमनाने ‘गंगा सावित्री’ निवासस्थानी आनंद आणि भक्तीचे वातावरण निर्माण झाले. विधिवत पूजा-अर्चा आणि आरतीनंतर राणा कुटुंबीयांनी गणरायाचे आशीर्वाद घेतले. पुढील नऊ दिवस बाप्पांची मनोभावे सेवा आणि आराधना करण्याचा आनंद राणा कुटुंबीयांना लाभणार आहे.

यावेळी आमदार रवी राणा यांनी अमरावतीसह राज्यातील नागरिकांना गणेशोत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. गणरायाच्या चरणी सर्वांच्या सुख, समृद्धी आणि आरोग्यासाठी प्रार्थना करत, प्रत्येकाच्या जीवनात आनंद आणि समाधान नांदावे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

गणरायाच्या आगमनामुळे राणा कुटुंबीयांच्या निवासस्थानी उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने परिसर भक्तिमय झाला असून, पुढील नऊ दिवस श्रद्धा आणि भक्तिभावाने गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button