राष्ट्रीय तपास यंत्रणा अमरावतीत दाखल,एकाची कसून चौकशीला सुरुवात

बुधवारी मध्यरात्री पथकाने छाया नगरातील एका 35वर्षीय युवकांला ताब्यात घेतले. या कारवाई ने अमरावती शहरात गुरुवारी एकच खळबळ उडाली.
पाकिस्तान मधील एका संघटने सोबत संपर्क असल्याचा संशय पथकाला आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा चे पथक गेल्या 15दिवसा पासून अमरावती शहरातील छाया नगर परिसरात युवकांच्या मागावर होते. त्याच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष देऊन होते अशी सूत्रांकडून माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे राष्ट्रीय तपास यंत्रनेच्या पथकाने आपल्या मोहिमेची चुणूक सुद्धा शहर पोलिसांना लागू दिली नाही.
एन आय ए म्हणजेच राष्ट्रीय तपास यंत्रणा च्या टीमने गुरुवारी सकाळी युवकांला राजापेठ पोलीस स्टेशनं आणून अनेक तासापर्यत कसून विचारणा करण्यास सुरुवात केली. एका खोलीत राष्ट्रीय तपास टीम पथक चे अधिकारी शिवाय कोणत्या ही स्थानिक पोलिसांना प्रवेश दिला गेला नाही हे विशेष. खोलीच्या बाहेर गुन्हे शाखा सह राजापेठ पोलिसांचा बंदोबस्त दिसून आला. NIA टीम ने अमरावती शहरासह इतर 17 ठिकाणी छापे टाकून अनेकांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे.
राष्ट्रीय तपास यंत्रनेने 17ठिकाणी छापे टाकले असून यात ,जम्मू काश्मीर, आसाम महाराष्ट्र, उत्तर प्रदेश गुजरात मध्ये छापा टाकण्यात आला. गेल्या पाच ते सहा महिन्यापासून सदर युवक पाकिस्तानच्या संपर्कात होता तसे फोन कॉल त्याला पाकिस्तान मधून सुरू होते अशी माहिती सुद्धा सूत्राकडून समोर येत आहे.या चौकशीत युवकांकडून कोणकोणती खळबळजनक माहिती समोर येणार या कडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे .



