पेढी नदीपात्रातून वाळूची तस्करी करणारे दोन ट्रॅक्टर केले जप्त

भातकुली तहसील अंतर्गत येणाऱ्या मौजा गणोजा येथील पेढी नदी पात्रातून अवैधरित्या वाळूची तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रालीवर महसूल विभागाच्या भरारी पथकाने कोंबिंग ऑपरेशन राबवून नदीपात्रातून वाळूचे दोन ट्रॅक्टर जप्त केलेत ११ डिसेंबरच्या रात्री ९.३० वाजता हि कारवाई करण्यात आली आहे.
गणोजा देवी पेढी नदीपात्रातून वाळूची तस्करी करणारे दोन ट्रॅक्टर जप्त करण्यात आले आहेत महसूल व पोलीस विभागाच्या भरारी पथकाने हि संयुक्त कारवाई केली आहे गणोजा येथे राहणाऱ्या पवन दादाराव वानखडे याचा ट्रॅक्टर क्र एम. एच. 27 बी. झेड. 8227 क्रमांकाच्या ट्रॅक्टरमधून तसंच दुसरा कानफोडी येथील सय्यद मुस्ताक सय्यद अब्बास याच्या ट्रॅक्टरमधून वाळूची तस्करी होत होती यावेळी तहसीलदार डॉ. अजित कुमार येळे, यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राम महसूल अधिकारी एस. एस. गील, विशाल दहाट , विजय दुधे, कोतवाल निलेश भातजोडे, रवींद्र खांडेकर,भातकुली पोलीस स्टेशन चे ठाणेदार रवींद्र राजूरवार, हेड कॉ. रहीम शेख, गौतम ढोणे,पंकज दयालकर, अजय मालकुटे, तुकाराम नरवाले, सनी सोलन, यांनी कारवाई केली पुढील दंडात्मक कारवाई करिता तहसील कार्यालय येथे दोन ट्रॅक्टर जमा करण्यात आले.



