citynewsLatest NewsMaharashtraNagpurNagpurCrimeNagpurPolice

नागपुरात लग्नाचे आमिष दाखवून २२ वर्षीय तरुणीचे लैंगिक शोषण; आरोपी अटकेत

इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना; लग्नास नकार दिल्यानंतर तरुणीची पोलिसांत तक्रार

नागपूर : लग्नाचे खोटे आश्वासन देऊन २२ वर्षीय तरुणीचे लैंगिक शोषण केल्याचा प्रकार नागपुरातील इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला आहे. याप्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी ओम गायकवाड (वय २०) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

लग्नाचे आश्वासन देऊन विश्वास संपादन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने तरुणीला लग्नाचे आश्वासन देऊन तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर तिला तिच्या मैत्रिणीच्या घरी नेले. तेथे मद्यधुंद अवस्थेत तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप तरुणीने तक्रारीत केला आहे.

लग्नास नकार दिल्यानंतर प्रकार उघड

काही दिवसांनंतर तरुणीने आरोपीकडे लग्नाबाबत विचारणा केली. मात्र, घरच्यांची संमती नसल्याचे कारण देत आरोपीने लग्न करण्यास नकार दिल्याचा आरोप आहे. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडित तरुणीने इमामवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

आरोपीला अटक; पुढील तपास सुरू

तरुणीच्या तक्रारीवरून इमामवाडा पोलिसांनी संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदवून आरोपी ओम गायकवाड याला अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

बाईट : जयवंत पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, इमामवाडा पोलीस ठाणे

सिटी न्यूज | नागपूर

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button