citynewsLatest NewsMaharashtraNagpurNagpurCrimeNagpurPolice

नागपुरात वाहनचोराला अटक! दोन चोरीच्या अॅक्टिव्हा जप्त

पाचपावली पोलिसांची कारवाई; मोतीबाग परिसरातील चोरीची कबुली, ९० हजारांचा मुद्देमाल हस्तगत

नागपूर | सिटी न्यूज

नागपूर शहरातील पाचपावली पोलिसांनी वाहनचोरीच्या गुन्ह्याचा छडा लावत एका आरोपीला अटक केली आहे. आरोपीकडून चोरीच्या दोन होंडा अॅक्टिव्हा दुचाकी जप्त करण्यात आल्या असून, त्यांची एकूण किंमत ९० हजार रुपये आहे. आरोपी सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

घरासमोरून अॅक्टिव्हा चोरी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंचशीलनगर येथील अर्चना ब्रह्मदास वानखेडे यांच्या जावई शिखा विष्णू वानखेडे यांची होंडा अॅक्टिव्हा (क्रमांक MH 49 CY 0046) घरासमोर उभी असताना चोरीला गेली होती. ३ ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास ही दुचाकी जागेवर नसल्याचे लक्षात आले. परिसरात शोध घेऊनही ती मिळाली नाही.

याप्रकरणी पाचपावली पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६३९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५ आणि ३३१(३) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मोतीबाग परिसरातील चोरीची कबुली

गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने मोतीबाग परिसरातून अॅक्टिव्हा चोरी केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याच्याकडून MH 49 CY 0046 क्रमांकाची दुचाकी जप्त करण्यात आली.

पुढील तपासात आरोपीने आणखी एका ठिकाणाहून होंडा अॅक्टिव्हा चोरी केल्याचे उघड झाले. MH 49 BP 0724 क्रमांकाची सुमारे ४० हजार रुपये किमतीची दुसरी दुचाकीही पोलिसांनी जप्त केली.

पाच पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गुन्हे दाखल

पोलिसांच्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपीविरुद्ध पाचपावली, कळमना, अजनी, अंबाझरी आणि हुडकेश्वर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत वाहनचोरी, घरफोडी आणि इतर गुन्हे दाखल आहेत. आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून, त्याच्याकडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही कारवाई पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, सहपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अपर पोलीस आयुक्त विनिता शाह यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र बोबडे, पोलीस निरीक्षक विवेक पचघन, सहायक पोलीस निरीक्षक सचिन भोंडे आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

सिटी न्यूज | नागपूर

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button