Amravati GramincitynewsLatest NewsMaharashtra

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ५८ व्या पुण्यतिथीनिमित्त पालखी सोहळ्यात आमदार राजेश वानखडे यांचा सहभाग

मोझरी येथे पालखीचे भावपूर्ण स्वागत; पालखी वाहणाऱ्या पुरुषांना दुपट्टे तर महिलांना ब्लाऊज पीस देऊन केला सन्मान

मोझरी प्रतिनिधी : वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या ५८ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त श्री क्षेत्र गुरुकुंज आश्रम, मोझरी येथे आयोजित पालखी सोहळ्याला आमदार राजेश वानखडे यांनी उपस्थित राहून गुरुदेव भक्तांसोबत पालखीचे भावपूर्ण स्वागत केले.

यावेळी आमदार वानखडे यांनी पालखीचे दर्शन घेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होत आशीर्वाद घेतले. पुण्यतिथी महोत्सवानिमित्त परिसरात भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी विविध गावांमधून मोठ्या संख्येने पालख्या श्री क्षेत्र गुरुकुंज आश्रम येथे दाखल झाल्या. सकाळच्या सुमारास या पालख्यांनी संपूर्ण मोझरी गावाला प्रदक्षिणा घालत भक्तिमय वातावरणात सोहळा पार पाडला. त्यानंतर पालख्या आपापल्या गावांच्या दिशेने रवाना झाल्या.

पालखी वाहणाऱ्या भक्तांचा सन्मान

पालखी सोहळ्यादरम्यान आमदार राजेश वानखडे यांनी पालखी वाहण्याची सेवा करणाऱ्या पुरुष भक्तांना दुपट्टे, तर महिला भक्तांना ब्लाऊज पीस देऊन त्यांचा सन्मान केला.

पालखी वाहणाऱ्या गुरुदेव भक्तांच्या सेवाभावाचे कौतुक करत आमदार वानखडे यांनी त्यांच्याप्रती आदरभाव व्यक्त केला. श्रद्धा, सेवा आणि सामाजिक एकतेचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थित भक्तांकडून स्वागत करण्यात आले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी समाजाला दिलेल्या मानवता, सेवा, ग्रामविकास आणि सामाजिक एकतेच्या विचारांचे स्मरण यानिमित्ताने करण्यात आले. ५८ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त आयोजित पालखी सोहळ्याने मोझरी परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button