Amaravti GraminLatest News
कोल्हापुरी बंधाऱ्यातून ६ हजार हेक्टर क्षेत्राला सिंचनासाठी पाणी.
अमरावती जिल्ह्यात यंदा समाधानकारक पाऊस झाला आहे, त्यामुळे जिल्हा परिषद जलसंधारण विभागाच्या अख्यारीत येणाऱ्या जिल्हाभरातील २४७ पैकी 209 कोल्हापुरी साठवण बंधाऱ्यात चांगलाच जलसाठा जमा झाला आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांना सिंचनासाठी कालव्याद्वारे पाणी सोडण्यात येणार आहे, याचा अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ६ हजार ३४४ हेक्टर सिंचन क्षेत्राला लाभ होणार आहे, अमरावती जिल्ह्यात दरवर्षी रब्बी हंगामात गहू, हरभरा ह्या रब्बी पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते, या पिकांना या माध्यमातून सिंचनाची सोय उपलब्ध होणार आहे .



