AmravaticitynewsLatest NewsMaharashtra

अमरावतीत ५० रुपयांच्या लॉटरीने खुलले नशीब; राजश्री लॉटरीत २१ लाखांचे पहिले बक्षीस

जयस्तंभ चौकातील लकी लॉटरी सेंटरमधून विकलेल्या तिकिटाला लागला जॅकपॉट; ढोल-ताशे, फटाके आणि केक कापून जल्लोष

अमरावती | प्रतिनिधी

अमरावती शहरातील जयस्तंभ चौक परिसरातील लकी लॉटरी सेंटरमधून विकल्या गेलेल्या राजश्री गोवा स्टेट साप्ताहिक लॉटरीच्या अवघ्या ५० रुपयांच्या तिकिटाला २१ लाख रुपयांचे पहिले बक्षीस लागले आहे. या विजयानंतर लॉटरी सेंटरसमोर आनंदोत्सवाचे वातावरण निर्माण झाले असून ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत आणि विशेष केक कापून हा आनंद साजरा करण्यात आला.

लकी लॉटरी सेंटरमधून विकल्या गेलेल्या राजश्री गोवा स्टेट साप्ताहिक लॉटरीच्या विजयी तिकिटाचा क्रमांक 84-5447 असल्याची माहिती दुकान प्रशासनाने दिली. या तिकिटाला २१ लाख रुपयांचे पहिले बक्षीस लागल्याने संबंधित ग्राहकाचे नशीब उजळले आहे.

विजयी तिकिटधारकाचे दुकान संचालक महेश भरतिया यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर दुकानासमोर ढोल-ताशांच्या गजरात जल्लोष करण्यात आला. फटाक्यांची आतषबाजी करून उपस्थितांनी आनंद व्यक्त केला, तसेच २१ लाखांच्या बक्षिसाचे प्रतीकात्मक केक कापून हा आनंद साजरा करण्यात आला.

यावेळी बोलताना मनोज भरतिया यांनी सांगितले की, त्यांच्या लकी लॉटरी सेंटरमधून यापूर्वीही अनेक ग्राहकांना मोठी बक्षिसे मिळाली आहेत. विजेत्यांच्या आनंदात सहभागी होण्याची परंपरा त्यांनी कायम ठेवली असून, यावेळीही विजेत्याचे विशेष स्वागत करण्यात आले.

रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांसाठी १ कोटी २१ लाख रुपयांच्या बंपर ड्रॉची संधी उपलब्ध असल्याची माहितीही त्यांनी दिली. नशीब आजमावण्यासाठी आणि आपल्या प्रिय व्यक्तींना विशेष भेट देण्याच्या उद्देशाने नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

दरम्यान, अवघ्या ५० रुपयांच्या तिकिटामुळे २१ लाखांचे बक्षीस मिळाल्याने शहरात या लॉटरीची मोठी चर्चा रंगली आहे. या विजयानंतर आता आगामी बंपर ड्रॉमध्ये पुढचा भाग्यवान विजेता कोण ठरणार, याकडे लॉटरीप्रेमींचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button