BreakingNewsCity CrimeLetest NewsNagpur

नागपुरात अमली पदार्थांविरोधात पोलिसांची मोठी कारवाई; 52 ग्रॅम एमडी सदृश्य पावडर जप्त

लकडगंज परिसरात अमली पदार्थ विरोधी पथकाचा छापा; दोन आरोपी ताब्यात, 6 लाख 41 हजारांचा मुद्देमाल जप्त

नागपुरात अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात पोलिसांनी पुन्हा एकदा मोठी कारवाई केली आहे. लकडगंज परिसरात अमली पदार्थ विरोधी पथकाने धडक कारवाई करत तब्बल 52 ग्रॅम एमडी सदृश्य पावडर जप्त केली आहे. या कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आलं असून, तीन मोबाईल फोन आणि दुचाकीसह तब्बल 6 लाख 41 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या कारवाईनंतर अमली पदार्थांच्या तस्करीविरोधातील पोलिसांची मोहीम आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

नागपूर शहरातील लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत अमली पदार्थ विरोधी पथकाने ही मोठी कारवाई केली आहे.

23 ऑगस्ट रोजी सकाळी सात ते साडेनऊच्या दरम्यान घास बाजार, लोहा मार्केट परिसरातील मृदयास्वामी व्यायामशाळेसमोर पोलिसांनी छापा टाकत ही कारवाई केली.

या कारवाईत पोलिसांनी 52 ग्रॅम एमडी सदृश्य पावडर जप्त केली आहे. या पावडरची अंदाजे किंमत 5 लाख 20 हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

यासोबतच तीन मोबाईल फोन आणि काळ्या रंगाची अॅक्टिव्हा दुचाकीही पोलिसांनी ताब्यात घेतली. या सर्व मुद्देमालाची एकूण किंमत तब्बल 6 लाख 41 हजार रुपये असल्याचं सांगण्यात आलं आहे.

या प्रकरणात शेख इजाज शेख मेहमूद आणि जीवन कांताराम बारापात्रे या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

तर कुणाल गभणे आणि दर्शन चरडे हे दोघे सध्या पाहिजे आरोपी असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी क्रमांक एक, तीन आणि चार यांच्याविरोधात यापूर्वीही एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हे दाखल असल्याचा पूर्वइतिहास आहे.

या प्रकरणी लकडगंज पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याच्या कलम 8 क, 22 क आणि 29 अन्वये गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे.

अमली पदार्थांची तस्करी आणि विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कारवाईचा धडाका कायम ठेवला असून, या प्रकरणाच्या पुढील तपासात अमली पदार्थांचा स्रोत, त्याचा पुरवठा आणि या व्यवहारामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास केला जाण्याची शक्यता आहे.

नागपूर शहरात अमली पदार्थांच्या वाढत्या व्यवहाराला आळा घालण्यासाठी पोलिसांकडून सातत्याने कारवाया सुरू आहेत. त्यामुळे या कारवाईनंतर पुढे आणखी कोणती माहिती समोर येते, याकडे आता लक्ष लागलं आहे

नागपुरात अमली पदार्थांच्या व्यवहाराला आळा घालण्यासाठी पोलिसांनी कारवाईचा धडाका कायम ठेवला आहे. लकडगंज परिसरातील कारवाईत 52 ग्रॅम एमडी सदृश्य पावडरसह तब्बल 6 लाख 41 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे. आता या प्रकरणाच्या पुढील तपासातून अमली पदार्थांच्या तस्करीचं जाळं आणखी किती खोलवर आहे, हे स्पष्ट होणार आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button