AmravatiamravatiAmravati GramincitynewsCrime NewsLatest NewsMaharashtraMaharashtraCrime

नागपुरी गेट पोलिसांची मोठी कारवाई; अवैध गोवंश वाहतूक करणारे वाहन पकडले

तीन गोवंशांची सुटका; एका आरोपीला मालवाहू वाहनासह ताब्यात, ४ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त

अमरावती : शहरातील नागपुरी गेट पोलिसांनी अवैधरित्या गोवंशाची वाहतूक करणाऱ्या मालवाहू वाहनावर कारवाई करत तीन गोवंशांची सुटका केली आहे. या कारवाईत एका आरोपीला मालवाहू वाहनासह ताब्यात घेण्यात आले असून, पोलिसांनी एकूण ४ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २८ ऑगस्ट रोजी बीट मार्शल पोलीस शिपाई पोपट दर्शन गिरी आणि पोलीस शिपाई अमोल पानेकर यांना नेहरू नगर परिसरात मालवाहू वाहनातून तीन गोवंशांची अवैधरित्या वाहतूक केली जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली.

माहितीच्या आधारे नागपुरी गेट पोलिसांच्या डीबी पथकाने कारवाई करत संबंधित वाहनाचा शोध घेतला. TATA MEGA XL क्रमांक MH 04 HY 6367 या मालवाहू वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये तीन गोवंश आढळून आले.

पोलिसांनी वाहन चालक अब्दुल रशीद, वय ३२ वर्षे, रा. बिस्मिल्लाहनगर, अमरावती याला ताब्यात घेतले. वाहनामध्ये अंदाजे सात वर्षांची पांढऱ्या-काळ्या रंगाची गाय, अंदाजे नऊ वर्षांचा पांढऱ्या रंगाचा बैल आणि अंदाजे एक वर्षाचे पांढऱ्या रंगाचे वासरू आढळून आले.

ही जनावरे कत्तलीच्या उद्देशाने वाहतूक केली जात असल्याचे चौकशीत समोर आल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. पोलिसांनी मालवाहू वाहन आणि तीन गोवंश असा एकूण ४ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

सुटका करण्यात आलेल्या तीनही गोवंशांना देखभाल आणि सुरक्षेच्या दृष्टीने दास्तुरनगर, अमरावती येथील गोशाळेत जमा करण्यात आले आहे.

या प्रकरणी आरोपी अब्दुल रशीद याच्याविरुद्ध विविध संबंधित कलमांन्वये नागपुरी गेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त प्रांजली सोनवणे आणि सहायक पोलीस आयुक्त निलेश ब्राह्मणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कोटनाके यांच्या नेतृत्वाखाली डीबी पथकाने ही कारवाई केली.

अवैध गोवंश वाहतुकीविरोधात नागपुरी गेट पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून, या प्रकरणातील पुढील तपासाकडे आता लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button