AmravaticitynewsLatest NewsMaharashtra

अमरावतीत क्राईम ब्रांचची धडक कारवाई; राजापेठ परिसरातील कुंटणखाना उद्ध्वस्त

अमरावती – शहरातील अवैध धंद्यांवर अमरावती क्राईम ब्रांचने पुन्हा एकदा मोठी कारवाई करत राजापेठ पोलीस ठाणे हद्दीत सुरू असलेला कुंटणखाना उध्वस्त केला आहे.

क्राईम पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सातुर्णा एमआयडीसी, शिलांगण रोड परिसरातील भव्यदीप अपार्टमेंट येथे अचानक धाड टाकली. या कारवाईत फ्लॅटमध्ये सुरू असलेला कुंटणखाना उघडकीस आला.

पोलिसांनी घटनास्थळावरून कुंटणखाना चालवणाऱ्या महिलेसह दोन तरुणी आणि दोन ग्राहकांना ताब्यात घेतले आहे. ही संपूर्ण कारवाई अत्यंत गोपनीय पद्धतीने पार पडली.

या धाडीनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या या कारवाईचे स्वागत केले आहे. अशा अवैध धंद्यांवर कायमस्वरूपी आळा बसावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास गुन्हे शाखेकडून सुरू असून, आणखी काही महत्त्वाचे धागेदोरे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या कारवाईतून पोलिसांनी स्पष्ट संदेश दिला आहे की, शहरातील अवैध कृत्यांना कोणतीही माफी दिली जाणार नाही.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button