citynewsCrime NewsLatest NewsMaharashtraNagpur
शाळेत ७ फूट धामन साप आढळल्याने घबराट; सर्पमित्रांच्या तत्परतेने धोका टळला

नागपूर – शहरातील कोराडी रोडवरील भवन्स शाळेत एक धक्कादायक घटना घडली. शाळेच्या तळमजल्यावर विद्यार्थ्यांची आणि पालकांची वर्दळ सुरू असताना तब्बल ७ फूट लांबीचा धामन साप आढळल्याने एकच घबराट पसरली.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक सर्पमित्र अक्षय पाटील आणि दादू गणवीर घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अत्यंत सावधगिरीने आणि कौशल्याने सापाला पकडत परिस्थिती नियंत्रणात आणली.
यानंतर पकडलेल्या धामन सापाला मानवी वस्तीपासून दूर जंगलातील नदीकिनारी त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडण्यात आले.
सर्पमित्रांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला असून, शाळा प्रशासन तसेच पालकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.



