citynewsLatest NewsMaharashtraNagpurNagpurPolice

नागपुरात म्हाडाच्या बांधकामस्थळी भीषण अपघात! क्रेन कोसळून दोन कामगारांचा मृत्यू

गणेशपेठ परिसरातील घटना; दोन कामगार जखमी, खासगी रुग्णालयात उपचार सुरू

नागपूर : नागपूर शहरातील गणेशपेठ परिसरात म्हाडाच्या निर्माणाधीन इमारतीच्या बांधकामस्थळी मोठा अपघात घडला. काम सुरू असताना सुमारे १०० फूट उंच क्रेनचा वरचा भाग अचानक तुटून कोसळला. या दुर्घटनेत दोन कामगारांचा मृत्यू झाल्याची, तर अन्य दोन कामगार जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

क्रेनचा वरचा भाग तुटून कोसळला

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गणेशपेठ परिसरात म्हाडाच्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या कामाची जबाबदारी शिर्के कन्स्ट्रक्शन कंपनीकडे असल्याचे सांगण्यात येत आहे. बांधकामस्थळी क्रेनच्या साहाय्याने काम सुरू असताना अचानक क्रेनचा वरचा भाग तुटून खाली कोसळला.

या क्रेनवर काम करणारे मजूर उंचावरून खाली पडल्याने गंभीर अपघात घडला. या दुर्घटनेत दोन कामगारांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत.

जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार

अपघातात जखमी झालेल्या दोन कामगारांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दुर्घटनेनंतर बांधकामस्थळी एकच गोंधळ उडाला.

बांधकामस्थळाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

म्हाडाच्या निर्माणाधीन इमारतीत क्रेन कोसळून झालेल्या या दुर्घटनेमुळे बांधकामस्थळी कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. क्रेनचा वरचा भाग नेमका कोणत्या कारणामुळे तुटला, सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या का आणि अपघाताला जबाबदार कोण, याचा तपास होणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सिटी न्यूज | नागपूर

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button