AmravaticitynewsLatest NewsMaharashtra

संजय गायकवाड यांच्या वक्तव्याचे अमरावतीत संतप्त पडसाद; राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आंदोलन

आमदारांच्या पुतळ्याला चपलांचा हार घालून जाळले; एकनाथ शिंदेंनी राजीनामा घ्यावा – डॉ. फौजिया खान यांची मागणी

अमरावती : बुलढाण्याचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी शेतकऱ्यांबाबत केलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्याचे अमरावती शहरात तीव्र पडसाद उमटले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने माजी खासदार डॉ. फौजिया खान यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्याचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

पुतळ्याला चपलांचा हार घालून जाळला

आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी आमदार संजय गायकवाड यांच्या पुतळ्याला चपलांचा हार घातला. त्यानंतर पुतळ्याचे दहन करून संताप व्यक्त करण्यात आला. शेतकऱ्यांचा अपमान करणारे वक्तव्य सहन केले जाणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी मांडली.

संजय गायकवाड यांचा राजीनामा घेण्याची मागणी

या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या माजी खासदार डॉ. फौजिया खान यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार संजय गायकवाड यांचा तातडीने राजीनामा घ्यावा, अशी मागणी केली. शेतकरी संकटात असताना त्यांच्याबाबत अशा प्रकारचे वक्तव्य करणे चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले.

या आंदोलनातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आमदारांच्या वक्तव्याविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.

बाईट : डॉ. फौजिया खान, माजी खासदार तथा अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) महिला आघाडी

सिटी न्यूज | अमरावती

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button