Education News

पुणे करार दिनानिमित्त विद्यापीठात उद्या व्याख्यानमाला विद्यापीठातील डॉ. आंबेडकर अभ्यास केंद्राचा उपक्रम


अमरावती – संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील डॉ. आंबेडकर अभ्यास केंद्राच्यावतीने बुधवार दि. 1 ऑक्टोबर, 2025 रोजी दुपारी 4.00 वा. पुणे करार दिनानिमित्त डॉ. श्रीकांत जिचकार स्मृती संशोधन केंद्र सभागृहामध्ये व्याख्यानमालेचे आय़ोजन करण्यात आले आहे.
व्याख्यानमालेचे अध्यक्षस्थान विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे भूषविणार असून ‘पुणे करार : नैतिकता व राजकीय प्रतिनिधित्व’ या विषयावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. विकास जांभुळकर हे अभ्यासपूर्ण व्याख्यान देणार आहेत.  प्रमुख अतिथी म्हणून विद्यापीठ व्य.प. सदस्य डॉ. आर.डी. सिकची यांची प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहे.
तरी आयोजित व्याख्यानमालेचा सर्वांनी उपस्थित राहुन लाभ घ्यावा, असे आवाहन विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, डॉ. आंबेडकर अभ्यास केंद्राचे समन्वयक डॉ. संतोष बनसोड यांनी केले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button