Education News

पश्चिम विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ विदर्भ माध्यमिक शिक्षक संघात विलीन

आमदार श्री. सुधाकर अडबाले यांनी केले स्वागत

अमरावती : शिक्षक, संघटनात्मक बाब लक्षात घेता पश्चिम विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने विदर्भ माध्यमिक शिक्षक संघात औपचारिक विलीन करण्याचा निर्णय घेतला. रविवारी वाशिम येथे पार पडलेल्या विमाशी संघाच्या प्रांतीय सभेनंतर बैठकीत पश्चिम संघ विदर्भ माध्यमिक शिक्षक संघात अधिकृतपणे विलीन करण्यात आला. या निर्णयामुळे विदर्भातील शिक्षक चळवळ अधिक सक्षम, सशक्त आणि संघटित झाली आहे.

हा निर्णय संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या संमतीने घेण्यात आला. यावेळी उपस्थित सर्व पदाधिकारी यांनी संघटनात्मक ऐक्याची गरज अधोरेखित करत, शिक्षकांच्या प्रश्नांसाठी एकसंघाने लढा देण्याचा निर्धार व्यक्त केला.

अमरावती विभागातील शिक्षकांच्या प्रलंबित समस्या आणि अन्य प्रश्नांसाठी सातत्याने जिल्हा, विभाग, शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात येईल, असे विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह तथा आमदार सुधाकर अडबाले यांनी स्पष्ट केले.

या ऐतिहासिक निर्णयामुळे विदर्भातील शिक्षक चळवळीला नवचैतन्य प्राप्त झाले, असा विश्वास आमदार सुधाकर अडबाले व माजी आमदार व्ही. यू. डायगव्हाणे यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी प्रांतीय अध्यक्ष अरविंद देशमुख, प्रांतीय उपाध्यक्ष जयदीप सोनखासकर, विजय ठोकळ, विभागीय कार्यवाह बाळासाहेब गोटे, विनोद संगीतराव, नीरज डफळे, विजय विसपुते, विनायक उज्जैनकर, मंगेश धानोरकर, विजय भड, कडाळे सर, सुनील कोंगे, श्री. बेनीवाले, संजय धामणकर, पी. डी. राठोड, संकेत सावरकर, अयुब खान, विजय शिंदे, रामेश्वर अवचार, घुगे सर, पुरुषोत्तम म्हातारमारे, बबन ठाकरे, वाशिम जिल्हाध्यक्ष रामेश्वर वाळले, जिल्हा कार्यवाह कुलदीप बदर, गजानन इढोळे, मंगेश भोरे, पी. टी. शिंदे व मोठ्या संख्येने पदाधिकारी, शिक्षक उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button