विद्यापीठाच्या पदव्युत्तर भूगर्भशास्त्र विभागाच्या 65 विद्याथ्र्यांची एम.पी.एस.सी. मध्ये सहाय्यक भूगर्भशास्त्रज्ञ पदाच्या मुलाखतीसाठी निवड

विद्यापीठाच्या नावलौकीकात मानाचा तुरा – कुलगुरू
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या भूगर्भशास्त्र विभागातील 65 विद्याथ्र्यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या सहाय्यक भूगर्भशास्त्रज्ञ या पदाच्या मुलाखतीसाठी निवड झाली आहे. विद्याथ्र्यांनी मिळविलेल्या या उत्तुंग यशाचे मुक्तकंठाने कौतुक करुन विद्यापीठाच्या नावलौकीकात मानाचा तुरा रोवला, असे उद्गार कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी काढले.
मुलाखतीसाठी निवड झालेल्या सदर विद्याथ्र्यांकरिता भूगर्भशास्त्र विभागाने विद्याथ्र्यांना मुलाखतीतही यश मिळावे, या दृष्टीने विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करुन तांत्रिक विषयांची तयारी, मुलाखतीतील प्रश्नोत्तर तंत्र, आत्मविश्वास यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. तज्ज्ञ मार्गदर्शक डॉ. मनिष देशमुख, डॉ. चंद्रकांत भोयर, श्री. उदय पाटणकर, डॉ. संजय कराड, डॉ. मुर्कुटे, कुलसचिव डॉ. अविनाश आसनारे यांनी विद्याथ्र्यांना मौलिक मार्गदर्शन केले. विद्यार्थी आपल्या यशाचे श्रेय विभागप्रमुख डॉ. वाय. के. मावळे तसेच डॉ. पी. एस. तिडके यांना देतात. या यशाबद्दल कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांनी सर्व विद्याथ्र्यांचे अभिनंदन करून त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.



