शिक्षणासोबतच विद्याथ्र्यांचा सर्वांगीण विकास साधणे महत्वाचे-प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे

विद्यापीठाच्या पदव्युत्तर भौतिकशास्त्र विभागात फिजिक्स क्लबचे उद्घाटन
शिक्षण घेत असतांना विद्याथ्र्यांनी इतरही शैक्षणिक उपक्रमांमध्ये सहभाग घ्यावा, जेणेकरून सर्वांगीण विकास साधता येईल, असे आवाहन प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे यांनी विद्याथ्र्यांना केले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील पदव्युत्तर भौतिकशास्त्र विभागात फिजिक्स क्लबच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षीय भाषण करतांना ते बोलत होते. व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून भौतिकशास्त्र विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. श्रीनिवास ओमनवार, इन्क्युबेशन सेंटरच्या संचालक डॉ. स्वाती शेरेकर, भौतिकशास्त्र विभागप्रमुख डॉ. संदीप वाघुळे, डॉ. गजानन मुळे, भौतिकशास्त्र क्लबचा अध्यक्ष एम. एस. सी. भाग 2 चा विद्यार्थी आदित्य प्रधान उपस्थित होते.
प्रमुख अतिथी डॉ. श्रीनिवास ओमनवार म्हणाले, फिजिक्स क्लबच्या माध्यमातून घेतलेली जबाबदारी आपण पार पाडणे गरजेचे असून, विद्याथ्र्यांनी विविध उपक्रमांमध्ये सहभाग घ्यावा. डॉ. स्वाती शेरेकर यांनी स्टार्टअप विषयी विद्याथ्र्यांना माहिती दिली. विभागप्रमुख डॉ. संदीप वाघुळे यांनी विद्याथ्र्यांनी पदवी प्राप्त केल्यानंतर भविष्यात कोणकोणत्या संधी उपलब्ध होऊ शकतात याविषयी मार्गदर्शन केले.
यावेळी विभागातून नेट / सेट / गेट उत्तीर्ण तसेच गुणवत्ताप्राप्त विद्याथ्र्यांचा प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच फिजिक्स क्लबच्या सर्व सदस्यांना सुध्दा सन्मानित केले. विद्यार्थी समिती गठित करणे, विद्याथ्र्यांना मार्गदर्शन, प्रश्नमंजुषा स्पर्धा, सुप्त कलागुणांना वाव मिळावा, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रा. प्रियंका गोळे (ठाकरे) यांनी विद्यार्थी समिती सदस्यांच्या नावाची घोषणा केली. प्रास्ताविक आदित्य प्रधान, सूत्रसंचालन सार्थक गाडगे व कु. मानसी खिराडे यांनी, तर आभार प्रा. गौरव सातव यांनी मानले. प्रश्नमंजुषा स्पर्धेत शिवाजी महाविद्यालय, विद्याभारती महाविद्यालय, विदर्भ महाविद्यालयातील विद्याथ्र्यांनी भाग घेतला. सर्व सहभागी विद्याथ्र्यांचा इन्क्युबेशन सेंटरचे सी.ई.ओ. आनंद यादव यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी विद्याथ्र्यांनी विविध गीत, कथा, कविता सादर केल्या. कार्यक्रमाची सुरुवात संत गाडगे बाबा यांचे प्रतिमापूजन, दीपप्रज्वलन करुन विद्यापीठ गीताने झाली. कार्यक्रमाला विभागातील प्रा. अभिषेक धलस्कर, प्रा. विजय लोडे, प्रा. प्रियांका गोळे, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी उपस्थित होते.



