विद्यापीठाच्या एम.बी.ए. विभागाच्या संस्थात्मक शासन व व्यवस्थापन कार्यशाळेचा समारोप

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या व्यवसाय प्रशासन आणि व्यवस्थापन विभागामार्फत यूजीसी-मलवीय मिशन टीचर ट्रेनिंग सेंटर व महाराष्ट्र स्टेट फॅकल्टी डेव्हलपमेंट अकॅडमी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संस्थात्मक शासन व व्यवस्थापन या राष्ट्रीय कार्यशाळेचा यशस्वीरित्या समारोप झाला. अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, प्रमुख अतिथी म्हणून कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, जी. एच. रायसोनी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे उपस्थित होते.
कार्यशाळेत देशाच्या विविध ठाकाणांहून आलेल्या प्रख्यात डॉ. अनिल पांडे, डॉ. सुहास पाचपांडे, प्रा. वरदलक्ष्मी हेडा, श्री संतोष पानसे, डॉ. पोट्टुकुची राव या तज्ज्ञांनी कॉर्पोरेट गव्हर्नन्स, नेतृत्व, सार्वत्रिक मानवी मूल्ये, आत्मव्यवस्थापन व जीवन कौशल्ये या विषयांवर मार्गदर्शनपर व्याख्याने दिली. विभागप्रमुख डॉ. दिपक चाचरकर यांनी चार दिवसीय कार्यशाळेमधील उपक्रमांची वैशिष्ट¬े व निष्कर्ष सांगितले. कार्यशाळेदरम्यान विद्याथ्र्यांसाठी ट्रिझर हंट, केस स्टडी, ग्रुप डिस्कशन, अॅड मॅड शो अशा वविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांमुळे विद्याथ्र्यांना सर्जनशीलता, विश्लेषणशक्ती, टीमवर्क आणि संवादकौशल्ये प्रदर्शित करण्याची संधी मिळाली. यावेळी मान्यवरांचा शाल, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. विविध स्पर्धेतील विजेत्यांचा प्रमाणपत्रे व ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी विद्याथ्र्यांनी आपले अनुभव व अभिप्राय व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रा. शीतल दिव्या राणी, आभार डॉ. मुक्ता मंत्री यांनी मानले. ही कार्यशाळा शासन, नेतृत्व, मूल्ये आणि व्यवस्थापन कौशल्ये यांचा संगम साधणारी व सहभागींसाठी भविष्योन्मुख प्रेरणादायक ठरली.



