AmravatiEducation NewsLatest News

विद्यापीठाच्या पदव्युत्तर इंग्रजी विभागात मूल्याधारित अभ्यासक्रम सुरू

विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे विद्यापीठाचे आवाहन

                  संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील पदव्युत्तर इंग्रजी विभागामध्ये विद्यापीठ परीसरातील शैक्षणिक विभागांच्या सर्व विद्याथ्र्यांसाठी नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहे. यामध्ये ‘अंडरस्टँडिंग शेक्सपिअर’, ‘एजेस, मूवमेंट्स अॅन्ड लिटररी फॉर्म्स इन इंग्लिश लिटरेचर’, ‘रीडींग स्ट्रॅटजीस अॅन्ड टेक्निक्स’, ‘क्रिटीकल थिंकींग अॅन्ड अॅनॉलिसीस’, ‘कव्र्हसेशनल इंग्लिश इन एव्हरी डे लाईफ’, ‘ए शॉर्ट कोर्स इन ड्रामा अॅन्ड फिल्मस्’ अश्या विविध विषयांवर प्रत्येकी 30 तासांचे मूल्याधारीत लघू अभ्यासक्रम सेल्फ फायन्यांसिंग तत्वावर सुरु करण्यात आले आहेत.
                   सर्व अभ्यासक्रम विद्याथ्र्यांना व्यावहारिक दृष्टीने अत्यंत उपयोगी व लाभदायक असून, यशस्वीरित्या  अभ्यासक्रम पूर्ण करणा-या विद्याथ्र्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्याथ्र्यांना ‘अॅकेडमिक क्रेडीट्स’ (गुणांक) प्राप्त करता येईल. प्रत्येक अभ्यासक्रमासाठी नाममात्र शंभर रुपये नोंदणी शुल्क असून, अधिकाधिक विद्याथ्र्यांनी या अभ्यासक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभागप्रमुख डॉ. संदीप जोशी यांनी केले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button