AmravatiBadneraBadneraNewscitynewsLatest NewsMaharashtra

बडनेरा एमआयडीसीत बिबट्याचा वावर? सीसीटीव्हीत चित्रण कैद; व्यापारी आणि कामगारांमध्ये भीतीचे वातावरण

बडनेरा (प्रतिनिधी) : बडनेरा परिसरातील एमआयडीसी औद्योगिक वसाहतीमध्ये बिबट्या दिसल्याचे सीसीटीव्ही चित्रण समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. एफ-४९ औद्योगिक लेनमधील गोविंद कृपा उद्योगाच्या आवारात गेल्या दोन दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याची माहिती समोर आली आहे.

औद्योगिक परिसरात दिवसरात्र कामकाज सुरू असल्याने कामगार, व्यापारी आणि उद्योजकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी कामावरून ये-जा करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

या पार्श्वभूमीवर संबंधित सीसीटीव्ही चित्रणाची वनविभागाने तातडीने शहानिशा करून घटनास्थळी पाहणी करावी, अशी मागणी व्यापारी वर्ग आणि नागरिकांनी केली आहे. आवश्यकतेनुसार कॅमेरा ट्रॅप, शोधपथक आणि इतर प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात, अशीही मागणी होत आहे.

नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता सतर्क राहावे आणि वन्यप्राणी दिसल्यास त्याच्या जवळ जाण्याचा किंवा त्याला त्रास देण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन करण्यात येत आहे. बडनेरा एमआयडीसी परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी वनविभागाने तातडीने कारवाई करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button