citynewsCrime NewsLatest NewsMaharashtraMaharashtraCrimeThane

उल्हासनगरमध्ये आईकडून 19 वर्षीय मुलीची हत्या? प्रेमसंबंधांच्या वादातून घडल्याचा प्राथमिक संशय

स्कार्फने गळा आवळल्याचा आरोप; आई ताब्यात, हत्येमागील नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांचा तपास सुरू

ठाणे | प्रतिनिधी

ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर येथे 19 वर्षीय तरुणीच्या मृत्यूची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलीच्या प्रेमसंबंधांना विरोध असल्याच्या पार्श्वभूमीवर आईनेच तिची हत्या केल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी आईला ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.

माहितीनुसार, उल्हासनगरच्या कॅम्प क्रमांक 2 परिसरातील भैयासाहेब आंबेडकर नगर येथे रविवारी मध्यरात्री ही घटना घडली. मृत तरुणीचे नाव अमृता दत्ता गरड (वय 19) असे आहे. तिचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती समोर आली आहे.

प्राथमिक तपासानुसार, हे प्रेमसंबंध तिची आई आशा गरड (वय 40) यांना मान्य नव्हते. याच कारणावरून रविवारी मध्यरात्री साडेएक ते दोनच्या दरम्यान आई-मुलीमध्ये वाद झाला.

पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, वादाचे रूपांतर तीव्र भांडणात झाल्यानंतर आईने रागाच्या भरात मुलीच्या गळ्यातील स्कार्फने तिचा गळा आवळल्याचा आरोप आहे. या घटनेत अमृताचा मृत्यू झाला.

घटना घडली तेव्हा आई आणि मुलगी हॉलमध्ये होत्या, तर वडील आणि भाऊ घरातील दुसऱ्या खोलीत झोपलेले होते, अशी माहिती तपासात समोर आली आहे.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर आरोपी आईला ताब्यात घेण्यात आले असून तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणात हत्येमागील नेमके कारण काय होते, तसेच या घटनेमागे इतर काही कारणे होती का, याचा पोलीस सखोल तपास करत आहेत.

या प्रकरणातील आरोप आणि प्राथमिक निष्कर्ष हे आतापर्यंतच्या तपासावर आधारित आहेत. अंतिम सत्य पोलीस तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेनंतरच स्पष्ट होणार आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button