Amaravti GraminAmravatiAmravati Policscitynews

गणेशोत्सवासाठी अमरावती ग्रामीण पोलीस सज्ज! 3400 आरोपींवर कारवाई, 21 हजार CCTVची नजर; DJवरही नियम

अमरावती ग्रामीणमध्ये गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहात पार पाडण्यासाठी पोलीस दल सज्ज झाले आहे. पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांनी गणेश मंडळे आणि नागरिकांसाठी महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.

अमरावती ग्रामीणमध्ये यंदा जवळपास 1,509 सार्वजनिक गणेश मंडळे असून, प्रत्येक मंडळासोबत पोलीस कॉन्स्टेबल किंवा उपलब्धतेनुसार होमगार्ड समन्वयक म्हणून नियुक्त करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. गणेशोत्सवाच्या सुरुवातीपासून विसर्जनापर्यंत पोलिसांचा मंडळांसोबत समन्वय राहणार आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जवळपास 3,400 आरोपींवर प्रतिबंधक कारवाई केली जाणार असून, आतापर्यंत सुमारे 50 टक्के कारवाई पूर्ण झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

तसेच जिल्ह्यातील तब्बल 21 हजार CCTV कॅमेऱ्यांच्या माध्यमातून पोलिसांची नजर राहणार आहे. त्यामुळे उत्सवादरम्यान कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जाणार आहे.

DJ आणि ध्वनिक्षेपकासाठी परवानगी बंधनकारक असून, 75 डेसिबलची मर्यादा आणि न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करावे लागणार आहे. आक्षेपार्ह गाणी, घोषणा किंवा देखावे केल्यास कायदेशीर कारवाईचा इशाराही पोलिसांनी दिला आहे.

सोशल मीडियावर अफवा, आक्षेपार्ह व्हिडिओ किंवा तणाव निर्माण करणारा मजकूर फॉरवर्ड न करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. ‘गरुड दृष्टी’ उपक्रमांतर्गत सोशल मीडियावरील आक्षेपार्ह कंटेंटवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे.

1,509 गणेश मंडळे | 3,400 आरोपींवर प्रतिबंधक कारवाई | 21 हजार CCTVची नजर | DJसाठी नियम बंधनकारक

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button