AmravaticitynewsLatest NewsMaharashtra

अमरावतीच्या दस्तूर नगरमध्ये बैलपोळ्याचा उत्साह!

सुनील भाऊ राणा आणि उपमहापौर सचिन भेंडे यांच्या हस्ते नंदी बैलाचे विधिवत पूजन; शेतकरी बांधवांना शुभेच्छा

अमरावती : शेतकरी आणि बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा पारंपरिक बैलपोळा सण अमरावतीच्या दस्तूर नगर परिसरात मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. पारंपरिक पूजाविधी आणि नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण परिसरात शेती संस्कृतीचा जागर पाहायला मिळाला.

यावेळी श्री. सुनील भाऊ राणा आणि महानगरपालिकेचे उपमहापौर श्री. सचिन भेंडे यांच्या हस्ते नंदी बैलाचे विधिवत पूजन करण्यात आले. पूजेनंतर उपस्थित शेतकरी बांधवांना बैलपोळ्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या. शेतकऱ्यांच्या कष्टाला आणि त्यांच्या शेती संस्कृतीला यावेळी अभिवादन करण्यात आले.

बैलपोळा हा केवळ एक पारंपरिक सण नसून शेतकऱ्याच्या जीवनात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता, प्रेम आणि आदर व्यक्त करण्याचा दिवस आहे. वर्षभर शेतीच्या कामात शेतकऱ्याला साथ देणाऱ्या बैलांविषयीची ही कृतज्ञता पोळ्याच्या माध्यमातून व्यक्त केली जाते.

या कार्यक्रमाला संजय हिंगासपुरे, शिक्षण सभापती प्रीतीताई रेवणे, प्रशांत वानखडे, नंदाताई सावदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच नागरिक आणि शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होत पारंपरिक उत्सवाचा आनंद घेतला.

दस्तूर नगरमध्ये पारंपरिक पद्धतीने साजरा झालेल्या बैलपोळ्यामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. या उत्सवाच्या माध्यमातून शेतकरी संस्कृती, परंपरा आणि बैलांप्रती असलेले जिव्हाळ्याचे नाते पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button