citynewsFestival News

धावडा-समतानगरमध्ये पारंपरिक बैलपोळा उत्साहात

बैलांना आकर्षक सजावट करून विधिवत पूजन; ढोल-ताशांच्या गजराने परिसर दुमदुमला

भोकरदन तालुक्यातील धावडा आणि समतानगर परिसरात पारंपरिक बैलपोळा सण मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला. वर्षभर शेतकऱ्यांना शेतीच्या कामात मोलाची साथ देणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करत शेतकऱ्यांनी त्यांना आकर्षक पद्धतीने सजवून विधिवत पूजन केले.

बैलपोळ्यानिमित्त सकाळपासूनच परिसरात उत्साहाचे वातावरण होते. शेतकऱ्यांनी आपल्या बैलांना स्वच्छ धुऊन त्यांच्या अंगावर विविध रंगांनी नक्षीकाम केले. बैलांच्या शिंगांना आकर्षक रंग लावण्यात आले. तसेच गळ्यात घुंगरू, गोंडे, रंगीबेरंगी दोर आणि विविध सजावटीच्या वस्तू बांधून बैलांना सजवण्यात आले.

पारंपरिक वेशभूषेत शेतकरी आपल्या सजवलेल्या बैलांसह पोळा उत्सवात सहभागी झाले. बैलांची विधिवत पूजा करून त्यांना नैवेद्य दाखवण्यात आला. यावेळी वर्षभर शेतीच्या कामात साथ देणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

पोळा उत्सवात सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, गावातील पदाधिकारी, पोलीस पाटील, पारध पोलीस ठाण्याचे कर्मचारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सजवलेल्या बैलांचे दर्शन घेण्यासाठी महिला, पुरुष आणि लहान मुलांनी मोठी गर्दी केली होती.

ढोल-ताशांच्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. पोळा उत्सवातील विविध क्षण नागरिकांनी मोबाईलमध्ये छायाचित्रे आणि व्हिडिओच्या माध्यमातून टिपले. या पारंपरिक सोहळ्यामुळे ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडले.

बैलपोळ्याच्या माध्यमातून शेतकरी आणि बैल यांच्यातील अतूट नाते, तसेच ग्रामीण जीवनातील परंपरा आणि संस्कृती पुन्हा एकदा अधोरेखित झाली.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button