AmravaticitynewsCrime NewsLatest NewsMaharashtra

अमरावतीत आढळला अनोळखी इसमाचा मृतदेह; ओळख पटविण्याचे आवाहन

अमरावती शहरातील MIDC परिसरात एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. राजापेठ पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून मृताची ओळख पटविण्यासाठी नागरिकांना पुढे येण्याचे आवाहन केले आहे.

राजापेठ पोलीस ठाण्याने दिलेल्या माहितीनुसार, 13 मे 2026 रोजी सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास MIDC परिसरातील चाय कॅन्टीनजवळ अंदाजे 45 ते 50 वर्षे वयोगटातील एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला. काही नागरिकांनी संबंधित व्यक्तीला उपचारासाठी इर्विन रुग्णालयात दाखल केले होते. मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.

या प्रकरणी राजापेठ पोलिसांनी BNSS कलम 194 अंतर्गत आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. मृतदेह सध्या इर्विन रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आला आहे.

मृत इसमाचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे:

  • वय : अंदाजे 45 ते 50 वर्षे
  • उंची : सुमारे 5 फूट 5 इंच
  • बांधा : मजबूत
  • रंग : निमगोरा
  • चेहरा : गोल, पांढरी बारीक दाढी
  • केस : काळे व थोडे भुरकट
  • कपडे : अंगात पांढऱ्या रंगाचा ठिपकेदार शर्ट व पॅन्ट

राजापेठ पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, या व्यक्तीची ओळख पटत असल्यास तात्काळ पोलीस स्टेशन राजापेठ, अमरावती येथे संपर्क साधावा.

संपर्क क्रमांक :

  • पोलीस स्टेशन राजापेठ : 0721-2672010
  • वरिष्ठ पोलीस निरीक्षक : 99234 00338
  • पोहेकॉ. मुकेश परचाके : 77438 57198

अमरावतीतील नागरिकांनी ही माहिती जास्तीत जास्त शेअर करून संबंधित व्यक्तीच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button