AmravaticitynewsLatest NewsMaharashtra

“घरबसल्या मोबाईलवर करा जनगणना; अमरावतीत ‘स्व-गणना’ सुविधेला सुरुवात”

अमरावती जिल्ह्यात जनगणना 2027 साठी ‘स्व-गणना’ सुविधेला सुरुवात झाली असून नागरिकांना आता घरबसल्या मोबाईल किंवा संगणकावरून स्वतःची जनगणना नोंदवता येणार आहे. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी नागरिकांना या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

प्रशासनाच्या माहितीनुसार, 1 मे ते 15 मे 2027 या कालावधीत नागरिकांनी मोबाईल, टॅब किंवा संगणकाच्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीने आपली माहिती भरायची आहे. यामुळे नागरिकांना जनगणनेत सहभागी होण्यासाठी घराबाहेर पडण्याची गरज भासणार नाही.

ही सुविधा जनगणना प्रक्रिया अधिक सुलभ, वेगवान आणि पारदर्शक करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली आहे. नागरिकांनी अचूक माहिती भरून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे.

घरबसल्या काही मिनिटांत जनगणना पूर्ण करण्याची ही सुविधा नागरिकांसाठी सोयीची ठरणार असून, जास्तीत जास्त नागरिकांनी यात सहभागी व्हावे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button