citynewsCrime NewsLatest NewsMaharashtraNagpurNagpur gramin

नागपूरमध्ये भरदिवसा जबरी चोरी; चाकूचा धाक दाखवत वृद्धाला लुटलं, आरोपी काही तासांत अटकेत

नागपूर : शहरात पुन्हा एकदा भरदिवसा घडलेल्या जबरी चोरीच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, नंदनवन पोलिसांनी तात्काळ कारवाई करत काही तासांतच आरोपीला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ९ एप्रिल २०२६ रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास नंदनवन परिसरातील आदर्श नगर येथे ही घटना घडली. मोतीउर रहमान हे आपल्या घरासमोर बसून पेपर वाचत असताना अचानक एक तरुण त्यांच्या जवळ आला. त्याने चाकूचा धाक दाखवत त्यांच्या खिशातील अँड्रॉईड मोबाईल आणि सुमारे ४ हजार रुपये जबरदस्तीने हिसकावून नेले.

घटनेनंतर पीडितांनी आरोपीचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपीने शिवीगाळ करत धमकी दिली आणि तेथून पसार झाला.

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आरोपीची ओळख पटवली. सोहेल इकबाल कुरेशी (वय २१, रा. ताजबाग) असे आरोपीचे नाव असून, पोलिसांनी तत्काळ शोधमोहीम राबवून त्याला काही वेळातच ताब्यात घेतले.

पोलिस चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून, त्याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

भरदिवसा घडणाऱ्या अशा घटनांमुळे शहरातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असले, तरी पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे आरोपी जेरबंद झाल्याने नागरिकांनी काही प्रमाणात दिलासा व्यक्त केला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button