Crime NewsLatest NewsNagpur

कॅफेमध्ये सुरू होता बेकायदेशीर हुक्का पार्लर

नागपूर शहरात अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी सुरू केलेल्या ‘ऑपरेशन थंडर’ मोहिमेला आता जोर आला आहे. अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या कॅफे हाऊस चौकातील ‘सोन कॅफे’मध्ये बेकायदेशीररित्या हुक्का सेवा दिली जात असल्याची माहिती पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाली होती. या माहितीची खात्री करून पोलिसांच्या डीबी पथकाने नियोजनबद्ध कारवाई करत कॅफेवर अचानक छापा टाकला. या छाप्यामध्ये विविध प्रकारचे हुक्का फ्लेवर्स, पाईप्स, चिलम आणि इतर साहित्य असा एकूण ९,३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

प्राथमिक तपासात या ठिकाणी प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचा वापर करून हुक्का पार्लर चालवला जात असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी अंबाझरी पोलिसांनी कॅफे मालक आणि व्यवस्थापनाविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. दरम्यान, ‘ऑपरेशन थंडर’ अंतर्गत सुरू असलेल्या या कारवायांमुळे नागपूरमधील अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नागपूर पोलिसांचा हा ‘ऑपरेशन थंडर’ आता जोर धरत असून, अवैध धंद्यांविरोधात अशीच कारवाई पुढेही सुरू राहणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button