Crime NewsLatest NewsNagpur

अल्पवयीन मुलाला चाकूचा धाक दाखवत घरात घुसून दरोडा!

नागपूरमधील गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३ एप्रिल रोजी दुपारी साडेएकच्या सुमारास धक्कादायक दरोड्याची घटना घडली. दाभा परिसरातील वेलकम सोसायटीमध्ये राहणारे सतीश गडपायले हे कामानिमित्त घराबाहेर गेले होते. त्याचवेळी त्यांचा १७ वर्षांचा मुलगा श्रेयस घरी एकटाच टीव्ही पाहत होता. याच संधीचा फायदा घेत, एक स्विफ्ट कार आणि मोटारसायकलवरून आलेल्या आठ अज्ञात आरोपींनी घरात घुसखोरी केली. आरोपींनी श्रेयसला चाकूचा धाक दाखवत “पैसे दे नाहीतर मारून टाकू” अशी धमकी दिली आणि घरातील कपाटातून तब्बल ४० हजार रुपये जबरदस्तीने लुटून फरार झाले. या प्रकरणी गिट्टीखदान पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, गुन्हेशाखा युनिट क्रमांक २ ने तांत्रिक तपास सुरू करत घटनास्थळी भेट दिली. सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने विश्लेषण करण्यात आले.
तपासादरम्यान पोलिसांनी सापळा रचत चार आरोपींना अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये संदीप ठाकरे, सुमित उईके, ऋषभ वैश्य आणि निखिल पाटील यांचा समावेश आहे. चौकशीदरम्यान आरोपींनी इतर साथीदारांसह मिळून हा दरोडा केल्याची कबुली दिली.

पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट कार, मोबाईल आणि इतर मुद्देमाल असा एकूण ४ लाख २० हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. ही संपूर्ण कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट २ च्या पथकाने केली आहे. सध्या आरोपींना पुढील कारवाईसाठी गिट्टीखदान पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

अल्पवयीन मुलाला धमकावून दरोडा टाकणाऱ्या आरोपींना पोलिसांनी वेळीच पकडत मोठा गुन्हा उघडकीस आणला आहे. मात्र शहरात वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button