Crime NewsLatest NewsNagpur

शरीरावर एकही जखम नाही… मग मृत्यू कसा? अपघात की हत्या?

नागपूरच्या अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या जयनगर, पांढराबोडी परिसरात एक संशयास्पद मृत्यू समोर आला आहे. रोशन शिंगाडे असं मृत तरुणाचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रोशन आणि त्यांची पत्नी प्रज्ञा शिंगाडे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सतत वाद सुरू होते. शेजाऱ्यांच्या मते, दोघांमध्ये अनेक वेळा मारहाणीच्या घटना घडल्या होत्या, इतकंच नाही, तर यापूर्वीही प्रज्ञा शिंगाडे यांच्यावर पतीला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, काल अचानक रोशन यांची प्रकृती बिघडली पत्नीने त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. मात्र, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित केलं. आता इथंच या प्रकरणाला मोठं वळण मिळतं, कारण प्राथमिक तपासात रोशन यांच्या शरीरावर कोणत्याही प्रकारच्या बाह्य जखमा आढळलेल्या नाहीत

मग प्रश्न उभा राहतो – जर मारहाण झाली नाही, तर मृत्यू झाला कसा? स्थानिक नागरिकांनी मात्र स्पष्ट संशय व्यक्त केला आहे. त्यांच्या मते, हा मृत्यू साधा नाही.

दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी ‘मर्ग’ दाखल करून तपास सुरू केला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, पोस्टमार्टम रिपोर्टनंतरच सत्य समोर येणार आहे. आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button