Accident NewsBuldhanacitynewsLatest NewsMaharashtra

मेहकरमध्ये भीषण अपघात; दुचाकी-कार धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू, रस्त्यांच्या दुरवस्थेवर प्रश्नचिन्ह

बुलढाणा (प्रतिनिधी):
बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर-जानेफळ मार्गावर भीषण अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, रस्त्यांच्या दुरवस्थेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २७ मार्च रोजी दुपारी साडे दोन वाजताच्या सुमारास धनंजय गिरे (वय ३५) हे मेहकरहून जानेफळकडे दुचाकीने जात असताना समोरून येणाऱ्या MH-19-AX-7233 क्रमांकाच्या कारने त्यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की धनंजय गिरे यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच मेहकर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, या अपघातामागे रस्त्यांची अत्यंत खराब अवस्था हेही एक महत्त्वाचे कारण असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. मेहकर-जानेफळ मार्गावर मोठमोठे खड्डे असल्याने वाहनचालकांना रॉंग साईडने जावे लागते, त्यामुळे अपघातांचा धोका वाढत आहे.

स्थानिकांनी राज्य रस्ते विकास महामंडळावर दुर्लक्षाचा आरोप करत तातडीने रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. “खड्डे टाळताना जीव जातोय,” अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

या घटनेमुळे एक निष्पाप जीव गमावला गेला असला, तरी रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत प्रशासन कधी जागे होणार, हा प्रश्न मात्र अनुत्तरितच आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button