citynewsCrime NewsInternational NewsLatest News

नेपाळमध्ये कारवाईचा धडाका सुरूच; माजी ऊर्जा मंत्री दीपक खडका मनी लॉन्डरिंग प्रकरणात अटकेत

काठमांडू (प्रतिनिधी):
नेपाळमध्ये राजकीय स्तरावर कारवाईचा धडाका सुरू असून, माजी ऊर्जा मंत्री दीपक खडका यांना मनी लॉन्डरिंग प्रकरणात अटक करण्यात आली आहे. रविवारी (२९ मार्च २०२६) पोलिसांनी ही कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आर्थिक गैरव्यवहार आणि मनी लॉन्डरिंगच्या आरोपांप्रकरणी सुरू असलेल्या तपासाचा भाग म्हणून खडका यांना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

दरम्यान, या अटकेच्या एक दिवस आधीच माजी पंतप्रधान के.पी. शर्मा ओली आणि माजी गृहमंत्री रमेश लेखक यांनाही अटक करण्यात आली होती. सप्टेंबर महिन्यात भ्रष्टाचारविरोधी आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसक कारवाईत त्यांच्या भूमिकेवरून ही अटक करण्यात आली होती.

सतत होत असलेल्या या अटकसत्रामुळे नेपाळच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, प्रशासनाकडून भ्रष्टाचाराविरोधात कठोर भूमिका घेतली जात असल्याचे चित्र दिसत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button