AmravatiAmravatiMahanagarpalikaAmravatiMunicipalCorporationcitynewsLatest NewsMaharashtra

महानगरपालिकेत इंदिरा गांधी पुण्यतिथी व सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त अभिवादन

उपमहापौर सचिन भेंडे यांच्या हस्ते प्रतिमांना हारार्पण; राष्ट्रीय एकता दिनाची शपथ

अमरावती प्रतिनिधी | ३१ ऑक्टोबर २०२६

भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त अमरावती महानगरपालिकेत शनिवारी हारार्पण कार्यक्रम संपन्न झाला. यानिमित्त विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात इंदिरा गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

अमरावती महानगरपालिकेचे उपमहापौर सचिन भेंडे यांच्या हस्ते दोन्ही महान नेत्यांच्या प्रतिमांना हारार्पण करण्यात आले. देशाच्या एकात्मतेसाठी आणि राष्ट्रनिर्मितीसाठी या नेत्यांनी दिलेल्या योगदानाचे यावेळी स्मरण करण्यात आले.

हारार्पण कार्यक्रमानंतर राष्ट्रीय एकता दिनानिमित्त राष्ट्रीय एकतेची शपथ घेण्यात आली. देशाची एकता, अखंडता आणि बंधुता कायम राखण्यासाठी सर्वांनी योगदान देण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

या कार्यक्रमाला स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, सभागृह नेते चेतन गावंडे, नगरसेवक मनिष बजाज, उपायुक्त योगेश पिठे, सहाय्यक आयुक्त भूषण पुसतकर, प्रमोद मोहोड, अंतुलाल काळे, श्री. गोडबोले, गणेश काकडे, भूषण खडेकार, मंदार नानोटी, सतीश ताथोड यांच्यासह महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि सुरक्षा रक्षक उपस्थित होते.

राष्ट्रीय एकता दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात उपस्थितांनी देशाची एकता आणि अखंडता जपण्याचा संकल्प व्यक्त केला.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button