citynewsCrime NewsIndia NewsLatest News
एअर फोर्सच्या कर्मचाऱ्याला पाकिस्तानसाठी गुप्तहेरगिरी करताना अटक; संवेदनशील माहिती लीक केल्याचा आरोप

भारतीय वायुसेनेच्या (IAF) एका नागरी कर्मचाऱ्याला पाकिस्तानसाठी गुप्तहेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. हा कर्मचारी आसाममधील एअर फोर्स स्टेशनवर कार्यरत होता.
राजस्थान इंटेलिजन्सच्या माहितीनुसार, आरोपी 2023 पासून पाकिस्तानी गुप्तचर संस्थांच्या संपर्कात होता. चौकशीदरम्यान त्याने पैशांच्या मोबदल्यात संवेदनशील आणि गोपनीय माहिती पाकिस्तानी हँडलर्सना पुरवल्याची कबुली दिल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
अतिरिक्त पोलीस महासंचालक (इंटेलिजन्स) प्रफुल्ल कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजस्थान इंटेलिजन्स आणि एअर फोर्स इंटेलिजन्स यांनी संयुक्त कारवाई करत आरोपीला रविवारी (22 मार्च 2026) अटक केली.
सध्या या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून, आरोपीकडून आणखी महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.



