Crime NewsLatest NewsNanded

खरात प्रकरणानंतर नांदेडमध्ये भोंदू महाराजाने केला अत्याचार

नांदेड शहरातील भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही संतापजनक घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 39 वर्षीय महाराजाने एका 46 वर्षीय महिलेला “तुझ्याशी लग्न करतो” असे आमिष दाखवले. या विश्वासाचा गैरफायदा घेत जुलै 2025 पासून आरोपीने महिलेवर तीन वेळा लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. पीडित महिलेला दीर्घकाळ फसवणूक आणि मानसिक त्रास सहन करावा लागला. अखेर तिने धाडस करून भाग्यनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करत आरोपी महाराजाला अटक केली आहे. दरम्यान, राज्यात आधीच भोंदू बाबा कॅप्टन खरात प्रकरण गाजत असताना ही दुसरी घटना समोर आल्याने समाजात संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. धार्मिक विश्वासाचा गैरवापर करून महिलांचे शोषण करणाऱ्या अशा घटनांवर कठोर कारवाईची मागणी आता जोर धरत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button