gold rateLatest News
सणासुदीची खुशखबर! सोन्याच्या दरात दिलासादायक घसरण

सणासुदीच्या काळात सोन्याची खरेदी शुभ मानली जाते, मात्र गेल्या काही महिन्यांपासून वाढलेल्या दरामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका बसत होता. दरम्यान, आज सोन्याच्या भावात किंचित घसरण झाली आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा १,११,१७० रुपये असून, हा दर कालच्या तुलनेत ११० रुपयांनी कमी आहे. ८ ग्रॅम सोन्याचा दर ८८,९३६ रुपये झाला आहे, तर १० तोळ्यांच्या खरेदीवर १,१०० रुपयांची बचत होणार आहे.
२२ कॅरेट सोन्याचे दर देखील कमी झाले असून प्रति तोळा १०० रुपयांनी स्वस्त होऊन १,०१,९०० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे ८० रुपयांची घसरण होऊन दर ८१,५२० रुपये झाले आहेत. याशिवाय १८ कॅरेट सोनंही १० ग्रॅममागे ९० रुपयांनी स्वस्त झाले असून दर ८३,३७० रुपये आहेत. दरातील ही घसरण सणासुदीच्या खरेदीसाठी सर्वसामान्यांसाठी दिलासादायक ठरणार आहे.



