वायनाडमध्ये काँग्रेस नेत्याचा मृतदेह तलावात सापडला;

वायनाडमध्ये काँग्रेस नेते आणि मुल्लानकोल्ली ग्रामपंचायत सदस्य जोस नेलेडम यांचा मृतदेह घराजवळील तलावात आढळल्याने खळबळ उडाली आहे. प्राथमिक पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, नेलेडम यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला आहे. त्यांनी आधी हाताची नस कापली आणि त्यानंतर विष घेऊन तलावात उडी मारल्याचे दिसून आले आहे.
घटनेवेळी भारतीय काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी वायनाड दौऱ्यावर होत्या. तलावात उडी मारल्यानंतर स्थानिकांनी नेलेडम यांना बाहेर काढून रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला, मात्र रुग्णालयापर्यंत पोहचण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला.
पोलिसांनी सांगितले की, नेलेडम यांची चौकशी नुकताच एका स्थानिक काँग्रेस नेत्याला फसवणुकीच्या प्रकरणात सुरू झाली होती. या चौकशीदरम्यानच त्यांनी स्वतःचा जीव संपवल्याचे प्राथमिक निष्कर्ष आहेत. या घटनेमुळे वायनाडमधील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून तपास सुरू आहे.



