Latest News

हिंगोलीत तुफान पाऊस; रस्त्यावर पाणी साचले, बाजार समितीत हळद भिजून शेतकऱ्यांचा माल खराब

हिंगोली- हिंगोली जिल्ह्यात आज दुपारच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली, ज्यामुळे शहरातील रस्त्यांवर पाणी साचले आणि वाहतूक व्यवस्थाही ठप्प झाली. विशेषतः इंदिरा चौक आणि गांधी चौक परिसरात नागरिकांची हालचाल अडथळ्यात आली असून किरकोळ व्यापाऱ्यांचे साहित्य देखील पाण्याखाली राहिले.

दरम्यान, हिंगोलीच्या संत नामदेव कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेली हळद पावसामुळे भिजली आहे. यार्डातील पत्रे फुटल्यामुळे हळदीमध्ये पाणी शिरले असून व्यापाऱ्यांनी भिजलेली हळद योग्य भावाने खरेदी करण्यास नकार दिल्याने शेतकऱ्यांचा संताप वाढला आहे. हिंगोली हा देशातील सर्वाधिक हळद पिकवणारा जिल्हा असताना, बाजार समितीच्या असुरक्षित कारभारामुळे शेतकऱ्यांचा माल आणि उत्पन्न धोक्यात आले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button