आईने तिन्ही मुलींचा गळा दाबून खून केला

उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यात घरगुती वाद आणि आर्थिक तणावामुळे एक हृदयद्रावक घटना घडली. टोकरी गावातील भोजुपुरी पट्टी परिसरात तेज कुमारी (२९) नावाच्या महिलेने तिच्या तीन मुलींचा गळा दाबून खून केला. मृत मुलींची नावे गुंजन (७), किट्टू (२) आणि मीरा (५ महिने) अशी आहेत. घटनेनंतर तेज कुमारीने गळफास घेऊन स्वतःचा जीवही संपवला.
माहितीनुसार, तेज कुमारी आणि तिच्या पती विकास (बस ड्रायव्हर) यांच्यात सतत आर्थिक व कौटुंबिक वाद सुरू होते. या वादामुळेच महिलेने हा हृदयद्रावक निर्णय घेतल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस दल घटनास्थळी दाखल झाले आणि फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरील पुरावे गोळा केले. तिन्ही मुलींचे आणि आईचे मृतदेह पंचनाम्यासह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून, पोलीस बारकाईने तपास करत आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.



